Sunday, July 5, 2015

ही पत्रकारिता कुणाच्या कुंटणखान्यातली बाजारबसवी आहे?



 ‘महानगर’ सोडणार्‍या पत्रकारांबद्दलही (कपील) पाटिल यांनी मोठा कळवळा आणला आहे. आपल्या सहानुभूतीचा वाडगा त्यांच्यापुढेही धरला आहे. ‘महानगर’मधून अनेक पत्रकार आणि कर्मचारी इतर वृत्तपत्रात गेले हे खरे आहे. पण त्यापैकी बहुसंख्यजण चांगली संधी किंवा मोठा पगार मिळाल्याने गेले आहेत. त्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. ज्या चार असंतुष्टांचा बाऊ पाटिलबुवा करत आहेत, त्यांच्या चुकांची जाहिररित्या चर्चा करण्याची माझी तयारी आहे. पण या मंडळींची आहे काय, याची खातरजमा पाटिल यांनी करून घ्यावी. ‘महानगर’ हे माझं वृत्तपत्र आहे. ते शंभर टक्के माझ्या पद्धतीनुसार आणि विचारानुसार चालणार. माझे पत्रकारितेविषयी काही आग्रह आहेत. ते आग्रह ज्यांना परवडत नाहीत त्यांनी जरूर वेगळ्या वाटा शोधाव्यात. पण आजवर अशा वेगळ्या झालेल्या कितीजणांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे? तेव्हा सोडून गेलेल्या सहकार्‍यांचं भांडवल करण्याचं कारण नाही. त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक लोक माझ्यासोबत या संस्थेच्या सुरूवातीपासून आहेत. माझ्या गुणदोषांसकट त्यांनी मला स्विकारलं आहे. संस्थेत अडीच वर्षे काढणार्‍या आणि मिजास मारणार्‍या पाटिलबुवांपेक्षा कितीतरी मोठा वाटा या पडद्याआड राहिलेल्या सहकार्‍यांचा आहे.’

पत्रकारांचे व त्याच्या मालकांचे परस्पर संबंध कसे असायला हवेत, त्याचे हे स्वरूप निखील वागळे यांनी त्यांच्याच ‘शंभर टक्के’ मालकीच्या सांज दैनिकाच्या संदर्भात लिहीताना स्पष्ट शब्दात लिहीलेले आहे. त्यानुसार कुठे नोकरी करणार्‍या पत्रकार ‘चाकराला’ कुठले श्रेय वा अधिकार असू शकतात काय? जो मालक असतो, त्याचाच अधिकार चालतो. मालकाची पद्धत व विचारानुसार माध्यमे चालली पाहिजेत, असा अट्टाहास कोणाचा आहे? कुणा मुकेश अंबानी वा जैन-दर्डा नामक मारवाडी भांडवलदाराचा नाही. ते तर नुसते कामगाराला पिळणारे व माध्यमांवर नियंत्रण ठेवून अविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी करणारे असतात. निखीलचा आव असा असतो, की तो मालक नसून सेवाव्रती पत्रकार आहे. पण जेव्हा तो मालकाच्या भूमिकेत येतो, तेव्हा त्याचा खरा चेहरा अशा रुपाने समोर येतो. मग सवाल इतकाच उरतो, की ही तथाकथीत पत्रकारिता निखील करतो ती कुणाच्या कुंटणखान्यातली बाजारबसवी आहे? कारण ती ‘महानगर’च्या रुपाने निखीलच्या मालकीची असते, तेव्हा पतिव्रता असते आणि कुणा दुसर्‍याच्या मालकीची होऊन निखीलला तिथे ‘चाकरी’ करायचा प्रसंग आला, मग त्याच पत्रकारीतेने मालकाशी दगाबाजी करून चाकर पत्रकाराशी व्याभिचार केला पाहिजे काय? नियम वा तत्वे अशी सोयीस्कर बदलून चालत नाहीत. आणि बदलायचीच असतील तर उगाच सतिसावित्रीचा आव आणायचे कारण नाही. कोणीही चाकर असतो तेव्हा त्याच्यावर मालकाचे अधिकार चालतात आणि मालक असतो तेव्हा त्याच्याच अधिकाराचे नियम तो सांगू लागतो. निखीलची गोष्ट थोडी वेगळी आहे. त्याला एकाच वेळी किंवा सोयीनुसार पतिव्रताही व्हायचे असते आणि व्याभिचारही मिरवायचा असतो. म्हणूनच ‘महानगर’चा मालक म्हणून हाकलून दिलेल्या आपल्या ‘चाकर’ सहकार्‍यांच्या लायकीचे वर्णन त्याने नेमके केलेले आहे. त्यांना स्वातंत्र्य मिळणार नाही. मालक निखीलच्या इच्छेनुसार व मर्जीप्रमाणे आपापले अविष्कार स्वातंत्र्य ‘महानगरी’ कुंटणखान्यात मांडायला हवे. निखील सांगेल त्याला सुखसमाधान पुरवायला हवे. ज्यांना पावित्र्य जपायचे असेल, अशा ‘वेगळा विचार’ करणार्‍यांनी वेगळ्या वाटा शोधाव्यात. मात्र निखील चाकर असेल, तर त्याच्या मालकाने तशी सक्ती त्याच्यावर करता कामा नये.

वर्षभरापुर्वी निखीलच्या राजकीय विचारांमुळे त्याला आयबीएन लोकमत वाहिनीतून डच्चू देण्यात आला. किंवा त्याला राजिनामा द्यावा लागला. त्यानंतर सातत्याने त्याला जी पोटदुखी जडली आहे, ते दुखणे मुळात एकोणिस वर्षापुर्वीचे कपिल पाटीलचे दुखणे आहे. आपण अहोरात्र राबलो आणि ‘महानगर उभा करायला हातभार लावला, अशीच कपीलची फ़िर्याद होती ना? मग ती निखीलने तेव्हा मालक म्हणून मानली होती काय? उलट कपीलची व त्याच्या मेहनतीची हेटाळणी करताना निखील काय लिहीतो? ‘संस्थेत अडीच वर्षे काढणारे आणि मिजास मारणारे पाटिलबुवा’. आज तेच शब्द लोकमत वाहिनीचे व्यवस्थापन बोलून दाखवत नसेल. पण त्यातली ‘भूमिका’ नेमकी दोन दशकांपुर्वीच्या निखीलचीच नाही काय? आज निखील नोकर असेल तर मालक असलेल्या अंबानी वा दर्डांच्या विचारानुसारच त्याला त्या वाहिनीचे काम करावे लागेल. त्यांच्याच पद्धतीनुसार पत्रकारिता करावी लागेल. त्याला निखील जुमानणार नसेल, तर त्याला वेगळा रस्ता दाखवणे त्या मालक वर्गाला भाग नाही काय? जसा निखीलने कपील पाटिल वा अन्य काही सहकार्‍यांना ‘महानगर’ बाहेरचा रस्ता दाखवला होता. तेव्हा कपीलच्या नाराजीही निखीलला खुपत होती. मग आज आपल्याच ‘महानगरी’ तत्वानुसार निखीलने अंबानीची पाठ थोपटायला नको काय? त्यांनी ‘मालक’ निखीलचा नियम वापरून ‘चाकर’ निखीलला त्याची खरी जागा दाखवून दिली आहे. त्याचेच नियम वापरून हे मालक म्हणू शकतील, की निखीलची तयारी असेल, तर त्याच्या चुकांचा पाढा तेही जाहिररित्या वाचून दाखवू शकतील, निखीलची त्यासाठी तयारी आहे काय? तत्वज्ञान, विचार, भूमिका असल्या शिळोप्याच्या गप्पा मारणे खुप सोपे असते. मात्र त्यांचे काटेकोर पालन खुप अवघड असते. छानछोकीची सवय लागलेल्या निखीलने असल्या गप्पा करू नयेत. व्रतस्थ पत्रकारिता व चळवळ खुप अवघड काम असते. ते छछोर गावगप्पा ठोकण्याइतके सोपे काम नाही. कार्पोरेट जनानखान्यात जाऊन लोळलेल्यांनी उगाच सतीचे वाण घेतल्याच्या गमजा करू नयेत. आपली अशी स्थिती कशामुळे आली, ते समजून घेण्यासाठी पंधरा वीस वर्षापुर्वी आपणच काय काय ‘तत्वे उत्सर्जित’ केलीत, त्याचे अवलोकन व परिशीलन करावे. मग वटसावित्री होऊन वडाची साल पिंपळाला लावायचा खुळेपणा करावा लागणार नाही.

आयबीएन लोकमत वाहिनीच्या संपादकांची नेमणूक राजकीय हेतूने मालकांनी केली म्हणून त्याच्यावर लोक विश्वास कसा ठेवतील, अशी चिंता निखीलने करायचे कारण नाही. त्यापेक्षा आपण शालेय शिक्षणही पुर्ण केल्याचा पुरावा नसलेला कोणी डॉक्टर म्हणून मिरवतोय, त्याच्या जनानखान्यात कसे जाऊन पडलो, त्याचा शोध घ्यावा. मग आपल्या विश्वासार्हतेचा किती बोर्‍या आधीच वाजला आहे, त्याची शुद्ध येईल. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची पदवी कुठल्या विद्यापिठाची वा किती खरी याबद्दल नरडीच्या शिरा फ़ुगवून बडबडणार्‍या निखीलने कधी डॉ. महेश मोतेवार नावाचे त्याचे ‘मालक’ कुठल्या अधिकारात डॉक्टर असे बिरूद मिरवतात, त्याचा शोध घेतला आहे काय? ज्या ‘मी मराठी’ वाहिनीवर निखील पॉईंट ब्लॅन्क नावाचा तमाशा सादर करतो, त्याचे मालक हेच मोतेवार आहेत ना? त्यांच्या प्रचारकी बातम्या तिथेच सतत दिल्या जातात ना? त्यात प्रत्येकवेळी मोतेवार यांचा उल्लेख ‘डॉक्टर महेश मोतेवार’ असा अगत्याने केला जातो. तेव्हा त्यांनी कुठला प्रबंध लिहून वा संशोधन करून ही पदवी संपादन केली? दुसर्‍यांच्या पदव्या बघायला निघायचे तर आपले कंबरेचे वस्त्र शाबुत असायला हवे ना? शक्य असेल तर मोतेवार यांच्या वेबसाईटवर जाऊन अजून निखील त्याचा शोध घेऊ शकतो. आपण कपीलच्या ‘आज दिनांक’ या दैनिकात झालेल्या गुंतवणूकीचे वाभाडे आपण कशाला काढले होते, त्याचा निखीलला आज सोयीस्कर विसर पडलेला असावा. अन्यथा त्याने ‘डॉक्टर’ मोतेवारांच्या पदरी सेवा कशाला रुजू केली असती? वर आरंभी जो उतारा दिलेला आहे, तो निखीलच्याच १५ नोव्हेंबर १९९६ च्या कॅलिडोस्कोप सदरातला ‘आपलं महानगर’मधला आहे. बुद्धी ठिकाणावर असेल, तर आपल्याच त्या जुन्या लेखाचे व त्यातल्या मुद्दे विषयाचे निखीलने जरा परिशीलन करावे. अर्थात त्यासाठी अंगात व मनात किंचित तरी प्रामाणिकपणा असायला हवा.

6 comments:

  1. भाऊ निखील वागळेची पत्रकरीता महाराष्ट्र जाणतो
    सोयशास्त्रं वाफरून स्वताची इमेज करण्यात वाकबगार आहे . पण तुम्ही त्याला का मोठी करता ?

    ReplyDelete
  2. भाऊ,
    यामुळे वागळेला फुकटची प्रसिद्धि मिळते आहे हे विसरु नका.

    ReplyDelete
  3. Nikhil Wagle Atishay Bhampak Manus aahe. Prasiddhi sathi kuthlyahi level la janara. Bhau Tyala bhav n denech uttam nahi ka....

    ReplyDelete
  4. Wagle pudhe ABP maza che Khandekar adhik Satyanishtha aani talmaliche vatatat

    ReplyDelete
  5. भाऊ छान लेख !! राजकारणी लोक त्यांच्या ' काळ्या पैश्याचा ' विनियोग करण्यासाठी वेगवेगळे अपरिचित असे ' बुजगावणे ' लोक उभे करून अशा ' बोगस ' कंपन्या सुरु करत असतात. हे ' समृद्ध जीवन ' आणि ' मोतेवार ' हि नावे अचानक गेल्या दोन वर्षांपासून पुण्यामध्ये वेगवेगळ्या चौकात ' फ्लेक्स ' च्या रुपात झळकू लागल्यावरच या माणसाचा ' भंपक ' पणाची पुरेपूर खात्री पटली होती. दोन वर्षान पासून हा माणूस एक दिवस ' गोत्यात ' येणार हे निश्चित होते. त्यात त्याचे ' राष्ट्रवादी खान्ग्रेस ' चे ' गोड फादर ' सत्तेतून बाहेर फेकले गेल्यावर तर हे सर्व लवकर होणार हे जाणवत होते. त्यात हा माणूस आपल्या नावापुढे ' डॉ ' लावतो आणि कोणी त्याला हि ' डोक्तरेट ' कोठली हे विचारात नाही हेही सर्व ' चीट फंड ' कौशल्य विकसित केलेले ' भांड ' च होते. महाराष्ट्रात असे ' भांड ' भरपूर प्रमाणात निर्माण केले गेलेले आहेत. दुबई सारख्या ठिकाणी असे ' अपरिचित ' भांड लोक या राजकारणी लोकांच्या ' काळ्या पैशाचा ' हिशोब आणि विनियोगसाठी नेमलेली आहेत. ' निखिल वागळे ' या भंपक माणसाला ' आय बी लोकमत ' मधून ' डच्चू मिळाल्यावर ........या ' डॉ ' च्या आश्रयाला जावे लागले यातच सगळे काही आले. पश्चिम बंगाल मधील ' शारदा चीट फंडाशी ' पण याचे धागे दोरे जुळले आहेत. आता फक्त या चौकशीमधून काही बाहेर येते का... तेव्हढेच बघणे आपल्या हाती .

    ReplyDelete
  6. kadhi kadhi bhav n dilyamulech ase lok adhik bhav khaun jatat.....yana aapli olakh karun denyasathi bhauni mandleli mat yogyach aahet. tyamule aaj kahi dhikhau v vikau patrakarana he sagal lagu hot...........

    ReplyDelete