Sunday, October 15, 2017

राजकारणातले कुटुंबकलह

raj thackeray uddhav thackeray के लिए चित्र परिणाम

भांडुपच्या पोटनिवडणूकीत भाजपाचा उमेदवार निवडून आला व तिथे शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाल्याचा आनंद किरीट सोमय्यांना दिवसभरही अनुभवता आला नाही. इतक्यात मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक फ़ोडून सेनेने त्यांना आपल्यात सामावून घेतले. त्यामुळे दिवाळीपुर्वीच सेनेत दिवाळी सुरू झाल्यास नवल नाही. कारण मुंबई हा सेनेचा बालेकिल्ला आहे आणि अन्य कोणापेक्षा तो दिर्घकालीन मित्रानेच जमिनदोस्त करण्याचा विडा उचलला आहे. हा खरेच किती आनंदाचा विषय आहे आणि त्याची खरोखरीच गरज होती काय? कारण नांदेडमध्ये शिवसेनेला आपल्या दारूण पराभवापेक्षाही कॉग्रेसच्या मोठ्या विजयाचा आनंदोत्सव सुरू करायची वेळ आली होती आणि मुंबईतही पोटनिवडणूक गमावली होती. अशावेळी मनसेला नामशेष केल्याच्या खुशीत सेना असेल, तर भाजपाने दु:खी कशाला व्हावे? दोन चुलत भावांचे भांडण असे राजकीय हमरातुमरी होऊन बसली असेल, तर त्यांच्य विरोधकांनी दु:ख करण्याचे काही कारण उरत नाही. सहा नगरसेवक आपल्यात सामावून घेतल्याने सेनेला मुंबई महापालिकेत निर्विवाद बहूमत मिळालेले नाही. पण हे उद्योग न करताही सेनेला तितकी मोठी झेप खुप पुर्वीच घेता आली असती. पण प्रसंगावधान राखून आपले शत्रू व मित्रांना सोयीस्कर वापरण्याचे गणित सेनेला कधी समजणार आहे? ६ आणि ३० यातला फ़रक समजण्यासाठी मोठी कुशाग्र बुद्धी लागते असे नाही. आज आनंदोत्सव साजरा करणार्‍यांना हे ६-३० चे समोकरण तरी आठवते आहे काय? गेल्या फ़ेब्रुवारी महिन्यात मातोश्रीवर मनसेचे नेते व राज ठाकरे यांचे निकटवर्तिय बाळा नांदगावकर काही तास जाऊन बसलेले होते. कशाला? त्याचे कोणाला स्मरण आहे काय? तेव्हा नांदगावकर यांना प्रतिसाद मिळाला असता, तर आज असे सहा नगरसेवक पळवण्याची गरज तरी भासली असती काय?

मुंबईसह दहा महापालिकांच्या निवडणूका गेल्या फ़ेब्रुवारी महिन्यात चालल्या होत्या. त्याच काळात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचार मोहिमेला आरंभ केला आणि ऐनवेळी त्यांच्या पुत्राला गंभीर आजार असल्याचे निष्पन्न झाले. बाकी सर्व राजकारण बाजूला ठेवून पुत्राच्या उपचाराच्या मागे राज लागले होते आणि मनसेचा सर्व प्रचार थंडावला होता. त्यामुळे मग मनसे लढणार तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. अशा पालिका निवडणूकीच्या अखेरच्या टप्प्यात राज ठाकरे यांनी मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी अर्धा डझन तरी फ़ोन केले असतील. पण त्यांना प्रतिसाद मिळाला नव्हता. मग त्यांचे विश्वासू मानले जाणारे बाळा नांदगावकर स्वत: मातोश्रीवर पोहोचले होते आणि ती वाहिन्यांवर ब्रेकिंग न्युज झाली होती. मनसे व सेना एकत्र येणार अशी वदंता पसरली होती. पण दोन तासांनी नांदगावकर तिथून बाहेर पडले आणि पुढे काहीच झाले नाही. अखेर मतदानही झाले आणि अखेरच्या टप्प्यात राज ठाकरे यांनी दोन सभा घेतल्या. त्यांचे प्रचार व निवडणूकीतही लक्ष नव्हते. पुढे मतमोजणी झाली आणि निकाल हाती आले, तेव्हा मुंबईत सेना व भाजपा यांच्यात जवळपास बरोबरीचा विषय आला. महापौर कोणाचा होणार यावरही दिर्घकाळ खलबते होत राहिली. पण भाजपाने एकतर्फ़ी सेनेचे समर्थन करून हा विषय निकालात काढला होता. मात्र ते होईपर्यंत शिवसेना पक्षप्रमुखांना अपक्ष वा छोट्या पक्षांच्या नगरसेवकांची जमावाजमव करण्याची डोकेदुखी झालेली होती. ज्या मातोश्रीवर मागली पंधरा वर्षे कुणाशीही मसलत केल्याशिवाय महापौराचे नाव ठरत होते, तिथेच एक एक नगरसेवकाची मनधरणी करायची वेळ आली होती. बाळा नांदगावकर यांना हात हलवित परत पाठवले नसते, तर तशी वेळ आली नसती आणि आजही सहा नगरसेवक सामावून घेण्याची गडबड करावी लागली नसती.

त्या मुंबई महापालिकेच्या संग्रामात मनसे जवळपास लढणार नाही, असे निश्चीत झालेले होते. एकतर्फ़ी सेनेला पाठींबा देऊन टाकण्याच्या मनस्थितीत तेव्हा राज होते. कारण त्यांचा पुत्र असाध्य आजाराने ग्रासलेला होता. त्यासाठीच त्यांनी मातोश्रीशी संपर्क साधलेला होता. तो झाला नाही तर आपला दूत म्हणून नांदगावकरना धाडलेले होते. ते शक्य झाले असते तर मराठी मतातली दुफ़ळी टाळली जाऊन, शिवसेनेला पहिल्याच फ़ेरीत थेट बहूमतापेक्षा अधिक जागा मिळाल्या असत्या. कारण मनसेची मराठी मते दुफ़ळीने विभागली गेली नसती. पण तेव्हा शिवसेनेला पाकिस्तानपेक्षाही मनसे व राज ठाकरे अधिक मोठे शत्रू वाटत होते आणि म्हणूनच नांदगावकरांना रिकाम्या हाती पाठवण्यात धन्यता मानली गेली. त्याच्या परिणामीच भाजपाला मुंबईत ८० नगरसेवकांचा पल्ला गाठणे सोपे होऊन गेले. तेव्हा जी आकडेवारी प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार किमान ३० जागा अशा होत्या, की सेना व मनसेच्या उमेदवारांनी एकमेकांचे पाय ओढताना अन्य तिसर्‍या पक्षाला विजयी करण्यास हातभार लावला होता. शिवाय कुठलेही प्रयास न करता मनसेचे सात नगरसेवक निवडून आलेले होते. यांची एकत्रित संख्या ३५-४० इतकी होते. त्यात सेनेचे ८४ नगरसेवक जोडले तर संख्या १२० च्याही पार जाते. पण त्याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा म्हणजे तितक्या संख्येने भाजपाचे कमी लोक निवडून आले असते. ३५-४० संख्येच्या तुलनेत सहा हा कितीसा मातब्बर आकडा असतो? शिवाय तेव्हाच थेट सेनेच्या धनुष्यबाणावर ३० अधिक नगरसेवक निवडून आले असते, तर भाजपाचा पुरता हिरमोड करता आला असता. पण तेव्हा भाजपाला हरवण्य़ापेक्षाही राज ठाकरेंचे नाक कापण्याला प्राधान्य होते आणि आता त्यांच्या सहा नगरसेवकांना फ़ोडण्यात पराक्रम शोधला जात आहे. असेच राजकारण होत असते, तर शरद पवारांनी कधीच पंतप्रधान पदाचा पल्ला गाठला असता ना?

महापालिकेचे मतदान होत असताना राज ठाकरे निराश होते आणि तेव्हा कुठल्याही मार्गाने मनसे व सेना एकत्र आले असते, तर त्यांच्या मनोमिलनाला वेग आला असता. त्यातही कटूता आपोआप कमी झाली असती आणि दोन भावातील वैरभावनेला खतपाणी घातले गेले नसते. शिवाय भाजपाला मोठे लक्षणिय यश मिळण्यातून रोखले गेले जाणे हा बोनस ठरला असता. पण शत्रू व मित्र हे राजकारणात धुर्तपणे वापरणार्‍या बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच आपल्या संस्थापकाची शिकवण पाळावीसे वाटले नाही. राज हा शत्रू नाही तर दुखावलेला भाऊ असतो, हे ज्यांना विचारात घ्यावे असे वाटले नाही; त्यांनीच भाजपाच्या यशाचा मार्ग मोकळा करून दिला. आता मरगळल्या मनसेला आणखी खच्ची करण्यातून काय होणार आहे? अशा राजकारणाने सूडबुद्धीला चालना दिली जात असते आणि राज ठाकरे यांना शत्रूच्या गोटात धाडण्याला त्यातून प्रेरणा मिळालेली आहे. सहा नगरसेवक गेल्याने हा तरूण नेता विचलीत किती होईल हे माहिती नाही. पण भावी राजकारणात हाताशी काही उरलेले नसताना, त्याच्यासाठी शिवसेना हा एक नंबरचा शत्रू मात्र झालेला आहे. त्यामुळे आपल्याला काय मिळणार यापेक्षाही चुलत भावाचे किती व कुठे नुकसान होईल, अशी त्याची खेळी असणार आहे. मुंबई व परिसरात मराठी मतांवर ज्यांना आपले राजकारण करायचे आहे, त्यांनी त्यातल्या भागिदारांना चुचकारून सोबत घेण्याला प्राधान्य असायला हवे. त्यांना कुठल्या वेळी कोण शत्रू व कोणत्या क्षणी कुठला शत्रू हा मित्र मानावा हे ठरवता आले पाहिजे. अन्यथा दिर्घकालीन राजकारणात टिकून रहात येत नाही. सहा नगरसेवक आपल्या गोटात आणल्याने तात्पुरत्या डावपेचात पक्षप्रमुखांनी बाजी मारली यात शंका नाही. पण भविष्यातल्या राजकारणात मात्र अनावश्यक असा जवळच शत्रू निर्माण करून ठेवला आहे. राजची त्यानंतरची भाषा त्याची साक्ष आहे. जे सहा महिन्यांपुर्वी सहज मिळत होते, ते असे शत्रूत्व वाढवून मिळवण्यात काय हंशील होते?

15 comments:

  1. Kharay bhau... atishay uttam vishleshan

    ReplyDelete
  2. Bhau uddhav thakare hey seneche Rahul Gandhi aahet. Va Sanjay raut he digvijay Singh. Seneche hey shevatche mothe yash aahe.

    ReplyDelete
    Replies
    1. योगेश काळेOctober 15, 2017 at 7:26 PM

      अगदी बरोबर...

      Delete
  3. जवळचा फायदा घेण्यासाठी लोक लांबच नुकसान बघत नाही...

    ReplyDelete
  4. सर अप्रतिम विश्लेषण.

    ReplyDelete
  5. अतिशय मार्मिक विश्लेषण...

    ReplyDelete
  6. "त्यानुसार किमान ३० जागा अशा होत्या, की सेना व मनसेच्या उमेदवारांनी एकमेकांचे पाय ओढताना अन्य तिसर्‍या पक्षाला विजयी करण्यास हातभार लावला होता."

    खरय भाऊ, मध्ये एक आकडेवारी पहिली होती त्यानुसार अश्या जागा होत्या जिथे सेना २० लाख, भाजपा १५ लाख आणि मनसे ७ लाख मत मिळाली होती.

    आणि तसं बघायला गेलं तर राज ठाकरे म्हणाले त्यात तथ्य आहेच. परवा सुद्धा मागितले असते तर सातही नगरसेवकांनी पाठिंबा दिला असता सेनेला.

    ReplyDelete
  7. भाऊ तुम्हाला नक्की कुठल्या अँगलने हे दिसतंय सर्व . राज ठाकरेंचा अगोदरपासुनचा अजेंडा सेनाविरोधी होता आणि आताही आहे . कदाचित तुम्ही मनसेच्या सभासदांची सोशल मिडीयावरची मुक्ताफळे बघत नसाल . मनसेला जीवदान मिळता कामा नये असं आमच्यासारख्या लाखो शिवसैनिकांची मनोमन इच्छा आहे . कारण साप म्हणू नये धाकला आणि भाऊ म्हणू नये आपला .

    ReplyDelete
  8. उत्तम विश्लेषन भाउ

    ReplyDelete
  9. sena wants raj and his party should not grow in maharashtra. its their priority agenda. they behave accordingly. we cannot advise to those, who have put their hands on ear.

    ReplyDelete
  10. पाठिशी कार्यकर्ते नसलेले व शाखा पातळीवर काम केले नसलेले, राऊत सारखे ऐतखाऊ जिथे प्रमुख सल्लागार असतात, तिथे असेच घडणार. दिघे,राणे,भुजबळ यांसारख्या झुंजार नेत्यांना बाहेर पडायला भाग पाडले गेले.

    ReplyDelete
  11. By getting 6 members added, Shivsena ensured that BHP does not claim Mahapaurpad as there was a danger that if both parties numbers would have same in coming days (with Bhandup election, the difference had left to 1 only). I think, this is smart move done by Shivsena. Pls. note that Uddhav is not at all in mood to give/take support from MNS in last many years. This is been proven multiple times. Looking at the overall strength of MNS left in Mumbai and all over Maharashtra, this party is on verge of death and so it is a matter of time. This is primarily due to wring policies of Raj.

    ReplyDelete
  12. राज यांच्या मुलाला काय झालय ????

    ReplyDelete